महेश बाबू आणि नम्रता शिरोडकर यांनी मुलगी सितारा नुकतीच टाइम स्वेअरवर झळकली आहे. तिचे फोटो सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत.
तिने एका ब्रँडसाठी मॉडेलिंग केलं आहे. तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून छोटी सितारा सगळ्यांच्या चर्चेचा विषय बनली आहे.
महेश बाबूची लेक सितारा येणाऱ्या 20 जुलैला तिचा 11वा वाढदिवस साजरा करणार आहे. इतर सेलेब्स किड्स हे त्यांच्या मस्ती आणि ट्रिप्सचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. तर दुसरीकडे महेश बाबूची मुलगी तिच्या कामामुळे चर्चेत आली आहे.
सिताराचे काही फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. ज्यात तिनं हेवी ज्वेलरी परिधान केली आहे. डायमंडने भरलेल्या या ज्वेलरीमध्ये सितारा देखील खुलून दिसत आहे.
सितारा एखाद्या नवरीप्रमाणे नटलेली दिसत आहे. तिनं सुंदर लेहंगा देखील परिधान केला आहे. सितारा या आऊटफिटमध्ये तिच्या वयापेक्षा जरा जास्त मोठी दिसतेय असं अनेकांनी म्हटलं आहे.
तर दुसरीकडे वयाच्या 10 व्या वर्षी थेट टाइम स्केअवर झळकण्याची संधी तिला मिळाल्याने अनेकांनी तिचं तोंडभरून कौतुक देखील केलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महेश बाबूच्या लेकीने म्हणजेच सिताराने एका ज्वेलरी ब्रँडच्या प्रमोशनसाठी तब्बल 1 कोटी रुपये घेतले आहेत.
सितारा ही सोशल मीडियावर सक्रिय असते. तिचे ट्रेडिशनल आऊटफिट्समधील फोटो ती शेअर करत असते. आतापासूनच तिच्यात मॉडेलिंगची आवड दिसून येत आहे. ती डान्सही शिकतेय