समीर चौघुलेंनी या पोस्टमध्ये लिहिलंय कि, 'Happy birthday ..... इशा... गेल्यावर्षीच आमच्या हास्यजत्रेच्या चमूत दाखल झालेला तगडा गडी... फारच कमी वेळात हिने हास्यजत्रेच्या वातावरणाशी जुळवून घेतलं... सहज सुंदर विनोदाची शैली आणि अत्यंत अप्रतिम आवाजाची दैवी देणगी लाभलेली आमची इशा ही लंडन ड्रामा graduate आहे..'
त्यांनी म्हटलंय कि, 'हिच्या "डे" आडनावावरून ही लोकांना बंगाली वाटते पण ही महाराष्ट्रीयनच आहे ...पण मग ती "डे" आडनाव का लावते हा प्रश्न कृपया तिलाच विचारावा.....स्वभावाने लोभस आणि तितकाच खट्याळपणा (किडे) जोपासणारी....आमच्या दोघांची जोडी skit मध्ये बेफाम फुलते...' असं म्हणत समीर चौघुलेंनी ईशाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.