वनिता सोशल मीडियावर चर्चेत आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने तिच्या लग्नापुर्वीच्या आयुष्याबद्दल सांगितलं आहे.
वनिताने नुकतीच सुमित लोंढे याच्यासोबत लग्नगाठ बांधली. सुमित आणि वनिता यांच्यात आधी मैत्री आणि नंतर प्रेम झालं. त्यानंतर दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला.
वनिताने नुकताच संपूर्ण स्वराज या चॅनेलसोबत एक पॉडकास्ट केला आहे. यात तिने तिच्या लग्नापुर्वीच्या नात्याबद्दल सांगितलं आहे.
लग्नापुर्वीच्या नात्यांबद्दल बोलताना वनिता म्हणाली, 'लग्नापूर्वी माझे अफेअर्स होते. मात्र एका क्षणानंतर आता अफेअर्स करायचे नाहीत असं मी ठरवलं.'
ती पुढे म्हणाली कि, 'पण अफेअर करायचं नाही म्हणजे लगेच लग्न करायचं असा काही विचार नव्हता. कारण मला त्याआधी खूप अनुभव आले होते. ते कसे अनुभव असतील याचा अंदाज तुम्ही लावू शकता. त्यामुळे लगेच लग्न करायच नाही असं ठरवलं.'
'त्यानंतर सुमित भेटला. आम्ही रिलेशनमध्ये आलो आणि आमचं लग्न करायचं ठरलं. शेवटी लग्नाचा निर्णय घेतला आणि तोच फायनल डिसीजन होता.' असं वनिताने सांगितलं आहे.
वनिता नेहमीच तिच्या खासगी आयुष्याबाबत खुलेपणाने बोलताना दिसली. वनिताने केलेल्या या खुलाश्याने चाहत्यांना आश्चर्य वाटत आहे.