छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता आणि डान्सर फैसल खानने 'भारत का वीर पुत्र - महाराणा प्रताप' या ऐतिहासिक मालिकेद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.
फैजलने आपल्या करिअरच्या प्रवासात खूप संघर्ष केला आहे. त्याचे वडील रिक्षाचालक होते. पण फैजलने आपल्या टॅलेंटने आपल्या वडिलांना नेहमीच अभिमान वाटायला लावला आहे.
फैजलने नुकतीच महागडी मर्सिडीज कार खरेदी केली आहे. रिक्षाचालक वडिलांच्या लेकाने मिळवलेलं हे यश पाहून त्याचे चाहते खूपच खुश झाले आहेत.
फैजलने झलक दिखलाजा 8, डान्स इंडिया डान्स लिटिल मास्टर्स 2, डान्स के सुपरकिड्स आणि डीआयडी डान्स का टशन सारखे अनेक रिअॅलिटी शो केले आहेत आणि तो विजेता देखील बनला आहे. तो शेवटचा धर्म योद्धा गरुडमध्ये दिसला होता.