बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षितची आई स्नेहलता दीक्षित यांचं रविवारी 12 मार्च रोजी निधन झालं.
या घटनेने अभिनेत्रीच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगरच कोसळला. आता आईच्या निधनानंतर माधुरी दीक्षितची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
आई बरोबरचा फोटो शेअर करत माधुरीने लिहिलंय कि, 'आज सकाळी उठले आणि मला आईची खोली रिकामी दिसली. जीवन कसं जगायचं हे तिने आम्हाला शिकवलं. तिने बऱ्याच लोकांना खूप काही दिलं. तिची आठवण आम्हाला सतावत राहील'.
माधुरी दीक्षित पुढे म्हणाली कि, 'आमच्या आठवणींमध्ये ती कायम असणार. तिची बुद्धी, सकारात्मकता, आशिर्वाद कायमच चांगली उर्जा देणारे होते. तिच्या आठवणींद्वारे आम्ही संपूर्ण आयुष्य जगू, ओम शांती' अशा भावना तिने व्यक्त केल्या आहेत.
माधुरीने तिच्या या पोस्टद्वारे आईवरचं प्रेम व्यक्त केलं आहे. तसेच संपूर्ण आयुष्यामध्ये आईच्या आठवणी कायमच बरोबर राहतील असंही ती म्हणाली.