अमर उपाध्याय टीव्ही विश्वातील लोकप्रिय चेहरा म्हणून त्याची ओळख आहे. अमरला सर्वाधिक प्रसिद्धी मिळाली ती त्याच्या 'मिहीर विरानी' या व्यक्तिरेखेमुळे. या माध्यमातून तो घराघरात पोहचला. जेव्हा त्याने हा शो केला तेव्हा तो 24 वर्षांचा हो
अमर चा जन्म 1 ऑगस्ट 1976 रोजी अहमदाबाद मध्ये झाला होता. अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्यानंतर त्याने फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटमधून अभिनयाचे शिक्षण घेतले. यानंतर त्याने मॉडेलिंगच्या दुनियेत प्रवेश केला. (instagram/amarupadhyay_official)
अमरला मॉडेलिंग च्या दुनियेत ओळख मिळाली आणि या माध्यमातून त्याला 1993 साली पहिला टीव्ही शो 'देख भाई देख' मिळाला. यात तो शेखर सुमनसोबत दिसला होता. यानंतर एकता कपूरची नजर त्याच्यावर पडली. त्याला 'क्यूंकी सास भी कभी बहू थी'मध्ये 'तुळशीचा नवरा 'मिहीर विरानी'ची भूमिका दिली.
मिहीरची भूमिका साकारताना अमर 24 वर्षांचा होता आणि आता तो 46 वर्षांचा आहे. पण आता तो पूर्वीपेक्षा अधिक हँडसम झाला असून त्याचा लूक पाहून चाहते म्हणतात, 'अरे 'मिहीर' पूर्वीपेक्षा जास्त हँडसम झाला आहे'.
अमरने 1999 मध्ये हेतल उपाध्याय हिच्याशी लग्न केले आणि या दोघांना दोन मुले आहेत. अमर अजूनही टीव्ही च्या दुनियेत सक्रीय आहे. याशिवाय तो नुकताच कार्तिक आर्यन स्टारर 'भूल भुलैया 2' या चित्रपटात दिसला होता. यात त्याने तब्बूच्या पतीची भूमिका साकारली होती.