राजस्थान, जैसलमेरमध्ये होणाऱ्या सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी या सेलिब्रेटी कपलच्या लग्नाची जोरदार तयारी सुरु आहे.
आज कियारा अडवाणीच्या हातावर मेहंदी सजणार आहे. सेलिब्रेटी मेहंदी डिझायनर वीणा नागदा कियाराला मेहंदी काढणार आहेत.
सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी ६ फेब्रुवारीला लग्न बंधनात अडकणार आहेत अशी माहिती समोर आली होती. मात्र आता त्यांच्या लग्नाविषयी मोठी अपडेट समोर आली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सिद्धार्थ आणि कियारा आता ६ फेब्रुवारीला नव्हे तर ७ फेब्रुवारीला लग्नबंधनात अडकणार आहेत.
रिपोर्ट्सनुसार, गणेश स्थापनेनंतर आज सिद्धार्थ आणि कियारा यांच्या लग्नाच्या विधींना सुरुवात झाली आहे.
आज मेहेंदी, हळदी, संगीत आणि डीजे नाईट होणार असून त्यासाठी वेगवेगळ्या थीम आणि स्टेज तयार करण्यात आली आहेत.