Sidharth- Kiara: लग्नानंतर पहिल्यांदाच रोमँटिक चित्रपटात एकत्र झळकणार सिद्धार्थ-कियारा; लवकरच सुरू होणार शूटिंग!
सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी हे आजकाल नेहमीच चर्चेत असतात. या दोघांचं प्रेम 'शेरशाह' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान फुललं होतं. हा चित्रपट चांगलाच गाजला होता. दोघांची लव्हस्टोरी देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. आता लग्नानंतर या दोघांना पुन्हा स्क्रीनवर एकत्र पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत. आता दोघे लवकरच एका सिनेमात एकत्र झळकणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. कोणता आहे हा सिनेमा जाणून घ्या डिटेल्स...
सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी हे बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय जोडपे आहे. या वर्षी फेब्रुवारीमध्ये राजस्थानमध्ये दोघांनी लग्नगाठ बांधली. आता लग्नानंतर या दोघांना पुन्हा स्क्रीनवर एकत्र पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत.
2/ 8
'शेरशाह'मध्ये आपल्या ऑन-स्क्रीन केमिस्ट्रीने लोकांची मने जिंकणारे सिद्धार्थ-कियारा लवकरच चाहत्यांची ही इच्छा पूर्ण करणार असल्याची माहिती समोर येत आहे.
3/ 8
दोघांना एका चित्रपटात एकत्र काम करताना पाहण्यासाठी चाहत्यांना आता जास्त वाट पाहावी लागणार नाही. वृत्तानुसार, कियारा आणि सिद्धार्थ लग्नानंतर त्यांच्या पहिल्या बॉलिवूड चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहेत अशी माहिती समोर आली आहे.
4/ 8
बॉलिवूडलाइफच्या एका रिपोर्टनुसार, कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा लवकरच शशांक खेतान दिग्दर्शित चित्रपटात एकत्र काम करणार आहेत.
5/ 8
रिपोर्टनुसार, 'सिद्धार्थ आणि कियारा हा चित्रपट एकत्र करण्यास तयार आहेत. या चित्रपटात दोघेही यापूर्वी कधीही न पाहिलेल्या भूमिकेत दिसणार आहेत.
6/ 8
बद्रीनाथ आणि हम्प्टी शर्मा की दुल्हनिया बनवणाऱ्या दिग्दर्शक शशांक खेतानचा हा चित्रपट रोमँटिक कॉमेडी असणार असल्याचं आहे.
7/ 8
या चित्रपटाच्या तारखा निश्चित झाल्या असून जुलै महिन्यात दोघेही चित्रपटासाठी कार्यशाळा सुरू करणार आहेत. या कार्यशाळेनंतर दोघे ऑगस्टमध्ये शूटिंगला सुरुवात करणार माहिती आहे.
8/ 8
तथापि, अद्याप निर्मात्यांकडून किंवा कलाकारांनी चित्रपटाबद्दल पुष्टी केलेली नाही. पण दोघांनाही पुन्हा पडद्यावर एकत्र पाहण्यासाठी चाहते उत्सुक झाले आहेत.