आता नुकतेच पहिल्या महिला प्रीमियर लीगचे आज उद्घाटन झाले आहे. या दिमाखदार उद्घाटनाच्या सोहळ्यात कियारा अडवाणी, कृती सेनन आणि गायक एपी धिल्लन यांनी खास परफॉर्मन्स सादर केले आहेत.
कियारासाठी व्यावसायिक आणि खाजगी आयुष्यासाठी हे वर्ष खूप छान राहिले आहे. तिने सिद्धार्थ मल्होत्रासोबत गाठ बांधली आहे तर व्यावसायिक आघाडीवर ती अनेक हिट चित्रपटांचा भाग आहे.
तिला या ठिकाणी परफॉर्मन्स सादर करताना पाहण्यासाठी चाहते उत्सुक होते. आता तिच्या परफॉर्मन्सची एक झलक समोर आली आहे.