KGF चित्रपटात रॉकी भाई ही भूमिका दाक्षिणात्य सुपरस्टार यशाने साकारली आहे. त्याचं संपूर्ण भारतात प्रचंड प्रमाणात फॅन फॉलोईंग आहे.
KGF या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. या सिनेमाचे दोन्ही भाग प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले तसेच बॉक्स ऑफिसवर सुद्धा या चित्रपटाने तुफान कमाई केली.
गेल्या वर्षी याच दिवशी या सिनेमाचा दुसरा भाग प्रदर्शित झाला होता. आता आज या सिनेमाच्या तिसऱ्या भागाविषयी मोठी अपडेट समोर आली आहे.
चित्रपटाला एक वर्ष झाल्याच्या निमित्ताने निर्मात्यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यात पुढच्या भागाविषयी मोठी अपडेट दिली आहे.
समोर आलेल्या व्हिडिओमध्ये 1978 ते 1981 पर्यंत रॉकी कुठे गायब होता, या चार वर्षांत रॉकीने काय केले, हा प्रश्न मांडला आहे.
त्यामुळे KGF: Chapter 3 ची कथा या चार वर्षांच्या आसपास विणली जाईल असे निर्मात्यांनी सूचित केले आहे.
आपल्या आईला दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी रॉकी परतणार का, KGF: Chapter 3 मध्ये नक्की काय दाखवलं जाणार हे जाणून घेण्याची उत्सुकता आता चाहत्यांना आहे.