कार्तिक आर्यनसाठी 2022 हे वर्ष यशस्वी ठरले आहे. त्याच्या 'भूल भुलैया 2'या चित्रपटाने प्रेक्षकांची मनं जिंकली.
वाढदिवसापूर्वी कार्तिक आर्यनने आयएफएफआय (IFFI) 2022 च्या उद्घाटनात आपल्या बहारदार परफॉर्मन्सने उपस्थितांची मने जिंकली.
वाढदिवसाच्या मुहूर्तावर कार्तिक आर्यन पांढऱ्या कुर्त्यामध्ये मुंबईतील प्रसिद्ध देवस्थान सिद्धिविनायक मंदिर येथे भेट देत बाप्पाचे आशीर्वाद घेताना दिसला.
कार्तिक सिद्धिविनायकाला एकटाच गेला नव्हता तर सोबत आई वडिलांनाही घेऊन गेला होता. यानिमित्तानं कार्तिकचे आई वडील पहिल्यांदा मीडियासमोर आले.
सिद्धिविनायकाच्या बाहेर कार्तिकबरोबर सेल्फी घेण्यासाठी त्याच्या चाहत्यांनी भोवती गराडा घातला होता.
कार्तिक आर्यनकडे वाढदिवस साजरा करण्यासाठी खूप काही आहे. 'धमाका'नंतर, कार्तिक आर्यनचा आगामी ओटिटी (OTT) चित्रपट 'फ्रेडी' प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे.