कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांचा आगामी चित्रपट 'सत्य प्रेम की कथा' मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा नुकताच प्रदर्शित झालेला ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.
कार्तिक आणि कियारा ही जोडी दुसऱ्यांदा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. या दोघांनी याआधी 'भुलभुलैय्या २' या सिनेमात पहिल्यांदा एकत्र काम केलं होतं. पुन्हा या चित्रपटात दोघांना एकत्र पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
नुकताच द कपिल शर्मा शोचा नवा प्रोमो रिलीज झाला आहे. कॉमेडी शोच्या नवीन प्रोमोमध्ये कार्तिक आर्यनसोबत कियारा अडवाणीही दिसत आहे.
या प्रोमोमध्ये कार्तिक 'माझ्यावर मुलं आणि मुली दोघंही लाईन मारतात' असं म्हणतोय. त्याच्या या खुलाश्याने सगळेच चकित होतात.
कार्तिकचं बोलणं ऐकून कपिल म्हणतो 'मुलं पण..?' त्यावर अभिनेता म्हणतो 'आता काय सांगू तुम्हाला...'कार्तिक आणि कपिलमध्ये नक्की कोणत्या विषयावरून हे बोलणं झालं हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांचा नवीन चित्रपट सत्यप्रेम की कथा 29 जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात कार्तिक आणि कियारा यांची रोमँटिक केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे.