कार्तिक आर्यन गेल्या काही दिवसांपासून स्वतःसाठी एक सुंदर घर शोधत होता. आता अखेर त्याला आपल्या स्वप्नातलं घर मिळालं आहे. हे घर कोणा दुसऱ्या-तिसऱ्याचं नसून बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरचं आहे.
एका वेबसाईटला मिळालेल्या माहितीनुसार, तीन वर्षांचा करार शाहिद आणि कार्तिकमध्ये झाला आहे. कार्तिकनं 45 लाख रुपये सिक्यॉरिटी डिपॉझिट तत्वावर भरले आहेत.
या करारानुसार कार्तिक शाहिद कपूरला एक वर्षापर्यंत 7.5 लाख रुपये भाडं दर महिन्याला देणार आहे. आणि प्रत्येक वर्षी म्हणे 7 टक्के रक्कम भाड्यात वाढवली जाणार आहे.
शाहिद कपूरच्या या लक्झरीयस अपार्टमेंटचा एरिया 3681 sq.ft मध्ये पसरलेला आहे,ज्याला दोन स्वतंत्र पार्किंग स्लॉट देखील आहेत.
कार्तिक आर्यन आतापर्यंत वर्सोवा मध्ये 459 स्क्वे.फिट एरिया असलेल्या अपार्टमेंटमध्ये राहत होता. जे त्यानं 2019 मध्ये जवळपास 2 करोडच्या आसपास खरेदी केलं होतं.
लवकरच कार्तिक त्याच्या 'बहुचर्चित' शेहजादा या चित्रपटात झळकणार आहे. या सिनेमात त्याच्यासोबत परेश रावल, क्रिती सेनन देखील दिसणार आहेत.