'कांतारा' चित्रपट पाहिल्यानंतर सगळेच ऋषभ शेट्टीच्या टॅलेंटचे चाहते झाले आहेत. कारण ऋषभने कन्नड भाषेतील या अॅक्शन थ्रिलरमध्ये केवळ अभिनयच केला नाही तर तो त्याचा लेखकही आहे आणि त्याने त्याचे दिग्दर्शनही केले आहे.
चित्रपटाच्या यशानंतर तो प्रेक्षकांमध्ये तुफान लोकप्रिय झाला आहे. आता या भागाची प्रेक्षक आतुरतेनं वाट पाहत आहेत.
एकेकाळी पैशांसाठी पाण्याच्या बाटल्या विकलेल्या ऋषभ शेट्टीने आज स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता त्याची एकूण संपत्ती करोडोंमध्ये आहे.
ऋषभ शेट्टी एक दशकाहून अधिक काळ कन्नड चित्रपटसृष्टीत कार्यरत आहे आणि त्याने स्वतःला दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून स्थापित केले आहे. त्याचं स्वतःच प्रोडक्शन हाऊस देखील आहे.
अनेक अभिनेत्यांप्रमाणेच ऋषभलाही आलिशान कारचा शौक आहे. रिपोर्टनुसार, त्याच्याकडे 83 लाख रुपयांची ऑडी Q7 आहे.
फार कमी लोकांना माहित आहे की शेट्टीने टीव्ही अभिनेता म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली आणि नंतर 2014 मध्ये 'उलीदावरू कंदंते' या चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं.
या स्टारने अभिनेता रक्षित शेट्टी स्टारर रिकीसाठी दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले. आता कांताराला मिळालेलं यश सगळ्यांनाच माहित आहे.
Mashable India मधील अहवालानुसार, शेट्टीची एकूण संपत्ती रु. 124 दशलक्ष म्हणजेच 12 कोटी 4० लाख इतकी आहे.