आज भारताच्या स्वातंत्र्यदिनाची अमृत महोत्सवी वर्ष पूर्ण होत असताना सगळीकडे आनंद आणि उत्साहाचं वातावरण दिसून येत आहे. बॉलिवूडच्या अनेक मोठ्या स्टार कलाकारांनी सुद्धा आजच्या दिवशी चाहत्यांना शुभेच्छा देत आजच्या दिवसाचा आनंद द्विगुणित केला आहे.
महानायक अमिताभ बच्चन यांनी भारतीयांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत एका अनोख्या अंदाजात राष्ट्रगीत सादर केलं आहे. बिग बीं सह यामध्ये अनेक लहान मुलं सहभागी झाली असून यावर्षीचा स्वातंत्र्यदिन अमिताभ यांनी मूकबधिर मुलांच्या साइन लँग्वेजचा वापर करत भारताचं राष्ट्रगीत गायलं आहे. त्यांच्या या अनोख्या शुभेच्छा सगळ्यांनाच आवडल्या असून त्यांच्या या उपक्रमाचं कौतुक होत आहे.
अभिनेता आयुष्मान खुराना आजच्या दिवसाचं औचित्य साधत जम्मू येथील BSF जवानांची भेट घेऊन आल्याचं समोर आलं आहे. यानिमित्ताने त्याने जवनांसोबत क्रिकेट खेळत त्यांच्या ट्रेनिंगमध्ये सहभाग सुद्धा घेतला. त्याने जवानांशी गप्पा मारल्याची दृश्य सुद्धा बघायला मिळत आहेत.
बॉलिवूडचं क्युट कपल विकी कतरिनाने सुद्धा भारतीय स्वातंत्र्याची 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या आनंदात सहभागी होत घरी तिरंगा फडकवल्याचं दिसून आलं. दोघांनी एक व्हिडिओ शेअर करून चाहत्यांना शुभेच्छा दिल्या.
अभिनेता अक्षय कुमारने सुद्धा एक सुंदर फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत आजच्या दिवशी शुभेच्छा दिल्या आहेत. त्याची कॅप्शन सध्या फारच लक्षवेधी ठरत आहे.
धाकड अभिनेत्री कंगना रनौतने सुद्धा चाहत्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सध्या कंगना डेंग्यूने ग्रस्त आहे. आजारी असूनही तिच्यामध्ये असलेलं देशप्रेम लपून राहिलं नसल्याचं बघायला मिळालं आहे. तिने शेअर केलेली इन्स्टाग्राम स्टोरी सध्या फार लक्षवेधी ठरत आहे.
भाईजान सलमान खानने सुद्धा एक स्पेशल फोटो शेअर करून स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये सलमान भारताचा झेंडा हातात घेऊन फडकवताना दिसत आहे.
अभिनेता कार्तिक आर्यनने सुद्धा एका आगळ्यावेगळ्या अंदाजात चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. कार्तिकने नौसेनेच्या जवानांसोबत एक अख्खा दिवस व्यतीत करून खूप धमाल केल्याचं बघायला मिळालं. यादरम्यान त्याने नौसेना दलातील सैनिकांच्या अनेक कथा ऐकल्या त्यांच्याशी गप्पा मारल्या. तसंच त्याने एक भलामोठा फोटो शेअर करत आपलं देशप्रेम दाखवलं आहे.
किंग खान एसआरके सुद्धा केंद्र सरकारच्या ‘हर घर तिरंगा’ मोहिमेत सहभागी झाल्याचं बघायला मिळालं. शाहरुखने आपल्या कुटुंबियांसोबत घरी ध्वजारोहण केल्याचं बघायला मिळालं.
विरुष्का म्हणजे विराट अनुष्का या कपलने सुद्धा तिरंग्यासह एक सुंदर फोटो शेअर करत स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
अभिनेत्री करिना कपूरने सुद्धा इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
तापसी पन्नू या अभिनेत्रीने अशोक चक्राबद्दल एक अत्यंत वेगळी माहिती शेअर करत आपल्या खास मेसेजसह स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.