इमली या प्रसिद्ध मालिकेतील अभिनेता करण वोहराच्या घरी चिमुकल्या बाळाचं आगमन झालं आहे. करण वोहरा दोन जुळ्या बाळांचा बाबा झाला आहे. करणची पत्नी बेला वोहरा हिनं 16 जून रोजी जुळ्या मुलांना जन्म दिला. करण बेला लग्नाच्या 11 वर्षांची आई-बाबा झालेत. दोन बाळांच्या आगमनानं बेला आणि करण खूप खुश आहेत. बाबा होताच करणला चाहत्यांनी शुभेच्छा दिल्यात. मुलांचा चेहरा पाहण्यासाठी त्यांनी उत्सुकता दाखवली आहे. बेलाच्या बेबी शॉवरचे फोटो तिनं शेअर केले होते. करण बेला यांनी रोमँटिक मॅटरनिटी फोटोशूट देखील केलं होतं.