एवढंच नाही तर सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलोवर्स असणाऱ्या मराठी मनोरंजन सृष्टीतील अभिनेत्रींच्या यादीत हृताचं नाव पहिल्या क्रमांकावर आहे.
एका मुलाखतीत ती म्हणाली, “मी ‘दुर्वा’ या मालिकेत जेव्हा काम करत होते तेव्हा सोशल मीडियाचा इतका विस्तार झाला नव्हता. पण मी जेव्हा ‘फुलपाखरू’ मालिकेत काम केलं तेव्हा सोशल मीडियावरून मला भरभरून प्रेम मिळालं.'
याच मुलाखतीत ती पुढे म्हणाली, 'सोशल मीडियामुळे फॉलोवर्स नक्कीच मिळतात पण तुम्हाला मनोरंजन सृष्टीत काम मिळवायचं असेल तर उत्तम अभिनय करावा लागतो.' याचं भान मला वेळोवेळी होतं म्हणून मी वाहवत गेले नाही.' असं भाष्य हृताने केलं आहे.
तसेच ती पुढे म्हणाली, 'सोशल मीडियावर माझे फॉलोवर्स जरी भरपूर असले तरी आज तिकीट काढून माझ्या कलाकृती बघायला येणाऱ्या प्रेक्षकांची संख्या खूप कमी आहे. हे चित्र बदलायला हवं.' असं चित्रपटसृष्टीबद्दलचं मत हृताने व्यक्त केलं आहे.