बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन आपल्या पर्सनल लाईफसोबतच प्रोफेशनल लाईफमुळे चर्चेत असतो. यावेळीसुद्धा एका गोष्टीमुळे ह्रतिक रोशन पुन्हा चर्चेत आला आहे.
अभिनेता हृतिक रोशन काल एका हॉटेलबाहेर एका मुलीसोबत स्पॉट झाला होता. त्या मुलीसोबतचा हातात हात धरलेला व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
हा व्हिडीओ समोर येताच सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे. त्या मुलीच्या चेहऱ्यावर मास्क होता. त्यामुळे ती मुलगी कोण होती हे लक्षात येत नव्हतं.
परंतु ती मुलगी कोण आहे? हे जाणून घेण्याची चाहत्यांना प्रचंड उत्सुकता लागली आहे. त्यामुळे आपण या मुलीबद्दल पाहणार आहोत.
मीडिया रिपोर्टनुसार, अभिनेता हृतिक रोशनसोबत काल जी मुलगी होती ती दुसरी कोणी नसून अभिनेत्री आणि म्युझिशियन सबा आझाद असल्याचं म्हटलं जात आहे.
सबा आझाद ही एक अभिनेत्री, थियेटर डिरेक्टर आणि म्युझिशियन आहे. तिने 'मुझसे फ्रेंडशिप करोगे' या रोमँटिक कॉमेडी चित्रपटात काम केलं आहे.
शिवाय सबा अनेक कॅडबरी, किट कॅट, व्होडाफोन, एअरटेल, पॉंड्स, सनसिल्क अशा अनेक जाहिरातींमध्ये ती झळकली आहे..
अभिनेता हृतिक रोशन आणि सबा आझाद एकेमकांना डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे. परंतु याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.