बॉलिवूडचे प्रसिद्ध जोडपे हृतिक रोशन आणि सबा आझाद या दोघांच्या प्रेमाच्या चर्चा सध्या चांगल्याच रंगल्या आहेत. दोघे अनेकदा रोमँटिक डेट आणि व्हॅकेशनसाठी एकत्र वेळ घालवताना दिसतात.
हृतिक आणि सबा अनेकदा एकमेकांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. दोघे सध्या परदेशात फिरायला गेले आहेत.
हृतिक आणि सबा हे जोडपं सध्या अर्जेंटिनाची राजधानी ब्युनोस आयर्समध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. सबाने हृतिकसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत ज्यांची चर्चा होतेय.
सबाने शेअर केलेला पहिला फोटो एका रेस्टॉरंटचा आहे. जिथे हृतिक रोशन तिच्यासमोर बसलेला दिसत आहे. हा फोटो शेअर करताना सबाने कॅप्शनमध्ये 'माय हिप्पो हार्ट' असं लिहिलं आहे.
तर दुसऱ्या फोटोमध्ये दोघेही खूप सुंदर दिसत आहेत.कपल सेल्फी घेताना पोझ देत आहे. हा फोटो शेअर करताना अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये त्या ठिकाणाचे नाव लिहिले आहे. हे कपल एकमेकांसोबत खूप आनंदी दिसत आहे.
काही दिवसांपूर्वीच हृतिकने सबासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला असल्याची बातमी समोर आली होती. त्यामुळे चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.
हृतिकने अजून दोघांच्या लग्नाबद्दल अपडेट देण्यास टाळाटाळ केली असली तरी अभिनेता दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधणार का हे पाहणं महत्वाचं आहे.
हृतिक आणि सबाची भेट एका सोशल मीडिया साईटवर झाली होती. सबा देखील अभिनेत्याप्रमाणे कलाक्षेत्रात कार्यरत असून ती एक गायिका आणि अभिनेत्री आहे. या दोघांचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असतात.