आज काल बॉलिवूड सिनेमापेक्षा OTT प्लॅटफॉर्मवरील सिरिज पाहायला लोकांना फार आवडते. एक काळ असा होता जेव्हा सर्व लोक बॉलिवूडमध्ये काम करण्यासाठी धडपड करायचे. पण सध्याच्या काळात मात्र मोठमोठे सेलिब्रिटी OTT प्लॅटफॉर्मवर काम करण्यासाठी सरसावतात.
आता OTT प्लॅटफॉर्मवर काम करणाऱ्या सेलिब्रिटींना देखील बॉलिवूडमध्ये काम करण्या इतकच मानधन मिळू लागलं आहे. असे काही चेहरे आहेत, ज्यांनी आपल्या अभिनयाने आपली जागा OTT प्लॅटफॉर्मवर पक्की केली आहे. पण तुम्हाला माहितीय का की इथे मोठमोठ्या अभिनेत्रींना किती मानधन मिळतं? किंवा इथे सर्वात जास्त मानधन मिळवणार अभिनेत्री कोण आहे? Siasat ने केलेल्या रिसर्चनुसार, OTT प्लॅटफॉर्मच्या टॉप 5 सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींवर एक नजर टाकू.
राधिका आपटे: राधिका आपटेने ओटीटी स्पेसमध्ये स्वतःसाठी एक स्थान बनवले आहे. सेक्रेड गेम्स, गोहुल यांसारख्या मालिकांमध्ये तिची कामगिरी चांगली होती. एकेकाळी ती नेटफ्लिक्सची सर्वात आवडती अभिनेत्री होती. तिचा हल्लीच मिसेस अंडरकव्हर वेब सिरिज झी5 वर रिलिज झाली आहे. राधिका ओटीटीवर एका प्रोजेक्टसाठी 4 कोटी रुपये घेते.
सुष्मिता सेन: सुष्मिता सेनच्या आर्या या वेबसिरीजने प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले. या क्राईम थ्रिलरचे दोन सीझन आले असून तिसरा यावर्षी रिलीज होणार आहे. सुष्मिताला ओटीटीवर मागणी आहे. त्यात तिचा 'ताली' हा चित्रपट JioCinema वर येण्यासाठी सज्ज आहे. ओटीटीवर सुष्मिताची फी प्रति प्रोजेक्ट 2 कोटी रुपये आहे.
सामंथा रुथ प्रभू: दक्षिणेतील सुप्रसिद्ध अभिनेत्री सामंथाने OTT वरील द फॅमिली मॅनच्या सीझन 2 सह पदार्पण केले. चित्रपटांमध्ये तिची मागणी कायम आहे. पण आता ती ओटीटीवर देखील पाहण्यासाठी लोक उत्सुक आहे. पुढील वर्षी, ती अॅमेझॉन प्राइमवर वरुण धवनच्या विरुद्ध सिटाडेलच्या भारतीय आवृत्तीमध्ये दिसणार आहे. ओटीटीवर तिची फी प्रति एपिसोड आठ लाख रुपये आहे.
प्रियामणी: द फॅमिली मॅनने साउथ अभिनेत्री प्रियामणीला हिंदी प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रियता दिली. या मालिकेचा तिसरा सीझन तयार होत आहे. तो 2024 मध्ये प्रदर्शित होईल असा अंदाज आहे. प्रियामणी यावर्षी अजय देवगणच्या मैदान आणि शाहरुख खानच्या जवान या चित्रपटात दिसणार आहे. OTT वर तिची फी प्रति एपिसोड 10 लाख रुपये आहे.