सुशांतने आत्महत्याच केली हे कशावरून? AIIMS च्या डॉक्टरांनी दिलं स्पष्टीकरण
अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (sushant singh rajput) कुटुंबाच्या वकिलांनी या प्रकरणात रिपोर्ट सादर करणाऱ्या एम्सच्या (aiims) समितीसमोर काही प्रश्न उपस्थित केले, ज्याची उत्तरं एम्सने दिली आहेत.


AIIMS च्या डॉक्टरांनी या प्रकरणाचा तपास करणाऱ्या CBI ला दिला. सीबीआयनेदेखील हा अहवाल मान्य केला आहे. मात्र एम्सच्या या रिपोर्टवर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.


सुशांतचा मृत्यू गळफासामुळे झाला हे रिपोर्टमधून सांगू शकता पण ही आत्महत्याच आहे हे कशावरून सांगता अशी विचारणा वकिलांनी केली. हे तर सीबीआयला आपला तपास आणि पुराव्यानुसार सिद्ध करावं लागेल, असं सुशांतच्या वडिलांचे वकील विकास सिंह यांनी म्हटलं.


विकास सिंह यांनी हा रिपोर्ट देणाऱ्या एम्सच्या पॅनेल प्रमुखांना पत्र लिहून याबाबत स्पष्टीकरण मागवलं. त्यांनी 9 प्रश्न विचारले. ज्याची उत्तरं एम्सने दिली आहेत.


सुशांतचा पोस्टमॉर्टेम त्या मृत्यूच्या दिवशी रात्री उशिरा का केला? - पोलीस अधिकारी आमच्याकडे आले, त्यांनीच आम्हाला पोस्टमॉर्टेम करायला सांगतिलं. त्यामुळे रात्री उशिरा पोस्टमोर्टेम केलं. 2013 च्या अधिसूचनेनुसार रात्री उशिराही पोस्टमॉर्टेम करू शकतो.


रात्री उशिरा पोस्टमॉर्टेमसाठी न्यायधीशांकडून परवानगी घेण्यात आली होती? - पोस्टमॉर्टमसाठी न्यायाधीशांच्या परवानगीची गरज तेव्हाच असते, जेव्हा एखाद्याचा कोठडीत असताना किंवा CrPC 176 अंतर्गत मृत्यू होतो. सुशांतची केस 174 CrPC अंतर्गत येते. त्यामुळे न्यायाधीशांच्या परवानगीची गरज नव्हती. पोलिसांना पोस्टमॉर्टेम करण्याचा अधिकार होता.


पोस्टमॉर्टेम करताना सुशांतच्या कुटुंबातील कुणी सदस्य हॉस्पिटलमध्ये होता? - सुशांतच्या कुटुंबातील कुणी सदस्य तिथं होतं की नाही लक्षात नाही. मात्र पोलिसांनी जे पेपर दिले, त्यावर त्याची बहिणीची सही होती. त्यानंतर सुशांतची बहीण, बहिणीचा नवरा आणि वडील ओपी सिंह पोस्टमॉर्टेम सेंटरवर आले होते.


सुशांतच्या शरीरावर काही निशाण असल्याचं सांगण्यात आलं मग पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये त्या जखमांचा उल्लेख का करण्यात आला नाही? - पोस्टमॉर्टेम रिपोर्टच्या सतराव्या कॉलमध्ये एका निशाणाचा उल्लेख आहे. त्याशिवाय त्याच्या शरीरावर कोणत्याही जखमा नव्हत्या.


अशा प्रकरणात ऑटोप्सीसाठी दोन ते तीन तास लागतात, मग सुशांतच्या प्रकरणात हे काम 90 मिनिटांत कसं पूर्ण झालं? - सामान्यपणे पोस्टमॉर्टेमसाठी एक तास लागतो. तसा त्याचा काही विशेष कालावधी नाही. आम्ही दीड तासात सुशांतच्या मृतदेहाचं पोस्टमॉर्टेम पूर्ण केलं. व्हिसेरादेखील राखून ठेवण्यात आला.


सुशांतच्या मृतदेहातून असं काय समजलं ज्यामुळे त्याच्या मृत्यूची थिअरी नाकारण्यात आली? - शरीरावर कोणतीही जखम झाल्याचे निशाण नव्हते, ज्यावरून हे सिद्ध होईल की मृत्यूपूर्वी त्याची झटापट झाली असावी. मानेवर जे निशाण आहेत ते त्या कापडाचे आहेत, ज्याच्यावर त्याचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत होता.


सुशांतने ज्या कापडाने गळफास घेतला ते कापड सुशांतचं वजन पेलू शकत होतं? - ज्या कुर्त्याने सुशांतने गळफास घेतला त्याची टेस्टही करण्यात आली. ज्यामध्ये ते कापड 200 किलोपर्यंत वजन पेलू शकतं, असं दिसलं. सुशांतचं वजन 200 किलोपेक्षा कमीच होतं.


पोस्टमॉर्टेममध्ये मृत्यूच्या वेळेचा उल्लेख का नाही? मुंबई पोलिसांनी वेळेबाबत प्रश्नचिन्हं उपस्थित केले होते. रिपोर्टमध्ये पोस्टमॉर्टेमच्या दहा ते बारा तास आधी सुशांतचा मृत्यू झाला अशी नोंद आहे.