मधल्या काळात जॉनी डेप एक्स वाइफ एंबर हर्डच्या कायदेशीर चौकशीत बिझी होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकण्यासाठी अभिनेता सज्ज झाले आहेत.
इतालवी आर्टिस्ट एमेडियो मोदिग्लिआनी ( Amedeo Modigliani ) यांच्या आयुष्यावर हा सिनेमा आधारित आहे.
एमेडियो मोदिग्लिआनी हे महान चित्रकार आणि मूर्तिकार होते. एमेडियो मोदिग्लिआनी यांच्या आयुष्यातील हिंसक घटनांचं चित्रण यात दाखवण्यात येणार आहे.
Modi सिनेमासाठी जॉन डेपनं कास्टिंग देखील केलं आहे. हॉलीवुड अभिनेता Al Pacino हे प्रमुख भूमिकेत असणार आहे.