हॉलिवूड अभिनेता अल पचिनो वयाच्या 83व्या वर्षी बाप होणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्याची गर्लफ्रेंड 8 महिन्यांची प्रेग्नंट आहे.
अल पचीनो गर्लफ्रेंज नूर अलफल्लाह बरोबर 2022 पासन एकमेकांना डेट करत होते. त्यांची गर्लफ्रेंड 29 वर्षांची आहे.
अल पचीनो यांची एक्स गर्लफ्रेंड जॉन टेरंट यांना देखील एक मुलगी आहे. तिचं ज्युली असून ती 33 वर्षांची आहे.
त्याचप्रमाणे 1997 ते 2003 पर्यंत अल पचीनो बेव्हरली डी एंजेलोला हिला डेट करत होते. त्यांना अँटोन आणि ऑलिव्हिया अशी दोन जुळी मुली झाली. ही मुलं आता 22 वर्षांची आहेत.
त्यानंतर आता 2022 पासून अल पचीनो नूर अलफल्ला हिला डेट करत होते. आता ते चौथ्यांदा वडील होणार आहेत.
अल पचीनो हे हॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते आहेत. आजवर त्यांनी 'स्कारफेस', 'सेंट ऑफ अ वुमन', 'हीट', 'सर्पिको', 'सी ऑफ लव्ह', सारख्या सिनेमात काम केलं आहे.