बॉलीवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा आता लग्नानंतर हॉलिवूडमध्ये स्थिरावली आहे. प्रियांका नेहमीच तिच्या आणि निकमधील वयाच्या अंतरामुळे चर्चेत असते. तिचा नवरा निक जोनास तिच्यापेक्षा वयानं लहान आहे. याबद्दलचा एक किस्सा तिनं एका मुलाखतीत सांगितला होता.
अभिनेत्री प्रियांका चोप्रा तिचा 40 वा वाढदिवस साजरा करत आहे, सध्या प्रियांका ‘सिटाडेल’ वेबसीरिजमुळे चर्चेत आहे. प्रियांकाच्या या सीरिजला चाहत्यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.
प्रियांकाने एका मुलाखतीत तिचा ‘मिस वर्ल्ड’ स्पर्धे दरम्यानचा किस्सा सांगितला होता. किताब जिंकला तेव्हा तिचा पती निक जोनस फक्त सात वर्षांचा होता. एवढंच नाही तर तेव्हा जोनस कुटुंबातील वातावरण कसं होतं याबाबत देखील तिनं सांगितलं होता.
प्रियांका म्हणाली होती की, मी मिस वर्ल्डचा किताब जिंकला तेव्हा निक सात वर्षांचा होता आणि त्याची भावंडं आठ –नऊ वर्षांची होती.
ती पुढे महणाली होती की, हा कार्यक्रम लंडन या ठिकाणी पार पडला होता. माझ्या सासऱ्यांना असे शो पाहायला फार आवडतात. ते शो पाहत होते आणि त्या ठिकाणी निक आला. तेव्हा दोघांनी मला मिस वर्ल्डचा किताब जिंकताना एकत्र पाहिलं होतं. हे सर्व व्हायचं होतं आणि आयुष्यात अशा गोष्टी आठवणींसाठी होत असतात, असंही प्रियांका म्हणाली होती.
प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांनी 2018 साली लग्नगाठ बांधली. त्यांना एक मुलगीदेखील आहे. निक आणि प्रियांका यांच्या मुलीचं नाव मालती मेरी असं आहे.
प्रियांका कायम मुलीसोबतचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. प्रियांका सध्या पती आणि मुलीबरोबर अमेरिकेत राहत आहे.