प्रार्थना बेहरे ही मराठी विश्वातील सुंदर, गोड आणि सोज्वळ अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. मराठी चित्रपट आणि मालिकांमुळे प्रार्थना बेहरे ही नावारुपाला आली.
सध्या ती माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत नेहा हे पात्र साकारत आहे. प्रार्थनाच्या लग्नाला बराच काळ उलटला आहे.
अनेक जण प्रार्थनाला तू आई कधी होणार असा प्रश्न विचारत असतात. तिने एका मुलाखतीत यावर स्पष्ट शब्दात उत्तर दिले होते.
प्रार्थना बेहरे बस बाई बस या कार्यक्रमात सहभागी झाली होती. यावेळी कार्यक्रमातील महिला वर्गाने तिला 'तू मालिकेत एका मुलीच्या आईचे पात्र साकारत आहे, तर मग खऱ्या आयुष्यात आई कधी होणार आहेस?' असा प्रश्न तिला विचारला.
ती म्हणाली, 'तुम्ही सर्व चांगलेच प्रश्न विचारताय ना? मग चांगलाच प्रश्न विचारा ना? असे प्रार्थना त्यांना म्हणाली. त्यावर महिला वर्गाने हे चांगलं आहे, असे म्हटले.'
त्यापुढे ती म्हणाली, माझ्या सासूबाईही हा शो बघत आहेत. पण मी काही वाईट काम करते का? पण मग हे सर्व झाल्यावर मला काम करता येणार नाही. नको ना… हा विषय नको.'
ती पुढे म्हणाली होती कि, 'मला खूप बाळं आहेत. आमच्या पाच पाळीव श्वान आहेत, १२ घोडे आहेत आणि मासे आहेत, दोन उंदीर आहेत, अशी खूप मुलं आहेत. त्याबरोबर मायरा माझी मुलगीच आहे.' असे तिने या प्रश्नाला टोलवाटोलवी करत उत्तर दिले.