मराठी कलाविश्वातील गोड गळ्याची गायिका तसेच अभिनेत्री म्हणून आर्या आंबेकरची (Aarya Ambekar) आहे. वयाच्या तिसऱ्या वर्षी आर्याने गायला सुरुवात केली होती. पाहा आर्या कशी झाली लोकप्रिय गायिका.
आर्याचे वडिल समीर आंबेकर हे डॉक्टर असून आई श्रुती आंबेकर या देखील गायिका आहेत. याशिवाय आर्याची आजी देखील गायिकाच होत्या. त्यामुळे आर्याला घरातूनच सुरांचं बाळकडू मिळालं होतं.
आर्या केवळ 2 ते 3 वर्षांची असतानाच तिच्यातील सूर तिच्या कुटुंबियांनी ओळखले होते. आणि तेव्हापासूनच ती सुरांचे धडे गिरवत आहे.
2008 साली तिने 'सा रे ग म प लिटिल चॅम्प्स' या रियॅलिटी शोमध्ये भाग घेतला होता. ज्यात तिची निवड झाली आणि ती अगदी शेवटच्या राउंडपर्यतही पोहोचली होती. तिने शो जिंकला नसला तरीही अनेक श्रोत्यांची मन तिने जिंकली होती. त्यानंतर आर्याला खरी ओळख मिळाली.
आर्याने यानंतर अनेक चित्रपटांसाठी गायण केलं. तसेच अनेक मालिकांचे शिर्षकगीते तिने गायली आहेत. तर ती सुपरहीटही ठरली आहेत. याशिवाय तिच्या सौंदर्याचीही तितकीच प्रशंसा केली जाते. 'यंग प्रिटी गर्ल' अशी तिची ओळख लहाणपणीच बनली होती.
2017 साली आर्याने 'ती सध्या काय करते' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यातीलही तिचं काम हे उल्लेखणाय ठरलं. याशिवाय चित्रपटातील गाणीही तिने गायली होती. अभिनेता अभिनय बेर्डे, अंकुश चौधरी, तेजश्री प्रधान यांच्यासोबत तिने काम केलं होतं.
लवकरच आर्या 'रंगीला रे ' या चित्रपटाही दिसणार असते. आर्याचा मोठा चाहतावर्ग असून सोशल मीडियावरही तिची मोठी फॅनफॉलोइंग आहे.
'कितीदा नव्याने', 'टिपूर चांदणे', 'गर्जती सह्याद्रीचे कडे' अशी अनेक सुपरहीट गाणी आर्याने गायली आहेत.