आज गुढीपाडवा आणि मराठी नववर्ष मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे. या नववर्षाला अनेक लोक नवनवीन संकल्प करत नववर्षाचं स्वागत करत आहेत. यामध्ये मराठमोळी अभिनेत्री वनिता खरातचासुद्धा समावेश आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम वनिता खरात नुकतंच लग्नबंधनात अडकली आहे. त्यामुळे लग्नानंतरचा हा पहिला गुढीपाडवा तिच्यासाठी प्रचंड खास आहे. वनिता खरातने एक नवा संकल्प करत हा गुढीपाडवा आणखीनच खास बनवला आहे. अभिनेत्रीने नुकतंच सकाळ दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं की, या नव्या वर्षात खूप काम करण्याचा आणि विशेष म्हणजे प्रचंड झाडे लावण्याचा संकल्प केला आहे. तसेच वनिता येत्या काळात रोहित शेट्टीच्या पहिल्या मराठी चित्रपटात झळकणार आहे.