Grammy Award : भारतीय संगीतकाराची अभिमानास्पद कामगिरी; ग्रॅमी पुरस्कारावर तिसऱ्यांदा कोरलं नाव
2023 च्या बहुप्रतिक्षित संगीत पुरस्कार कार्यक्रम ग्रॅमी अवॉर्ड्समध्ये भारताची मान पुन्हा एकदा उंचावली आहे. भारतीय संगीतकाराने अभिमानास्पद कामगिरी करत तिसऱ्यांदा हा प्रतिष्ठित पुरस्कार पटकावला आहे.
बेंगळुरू-स्थित संगीतकार रिकी केज यांनी त्यांचा तिसरा ग्रॅमी पुरस्कार जिंकला आहे.
2/ 8
रिकी यांना 'डिव्हाईन टाइड्स' या अल्बमसाठी हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.
3/ 8
अमेरिकन वंशाच्या संगीतकाराने प्रसिद्ध ब्रिटीश रॉक बँड 'द पोलिस'चे ड्रमर स्टीवर्ट कोपलँड यांच्यासोबत हा पुरस्कार शेअर केला.
4/ 8
65 व्या ग्रॅमी पुरस्कारांमध्ये, दोघांनी सर्वोत्कृष्ट इमर्सिव्ह ऑडिओ अल्बम श्रेणीमध्ये ग्रामोफोन ट्रॉफी जिंकली.
5/ 8
प्रसिद्ध संगीतकार रिकी केज यांनी 2015 मध्ये त्यांच्या 'विंड्स ऑफ संसार' या अल्बमसाठी पहिल्यांदा हा पुरस्कार जिंकला.
6/ 8
2015 मध्ये हा सन्मान मिळाल्यानंतर, रिकीला पुन्हा एकदा 2022 मध्ये 'डिव्हाईन टाइड्स' अल्बमसाठी 'बेस्ट न्यू एज अल्बम' श्रेणीत स्टीवर्ट कोपलँडसोबत ग्रॅमी पुरस्कार मिळाला.
7/ 8
रिपोर्ट्सनुसार, रिकीने जगभरातील 30 देशांमध्ये एकूण 100 संगीत पुरस्कार जिंकले आहेत. रिकीला त्यांच्या कामासाठी युनायटेड नेशन्स ग्लोबल मानवतावादी कलाकार आणि भारताचे युवा आयकॉन म्हणून नामांकन मिळाले आहे.
8/ 8
2021 मध्ये रिलीज झालेल्या त्याच्या लोकप्रिय अल्बम 'डिव्हाईन टाइड्स'मध्ये नऊ गाणी आणि आठ म्युझिक व्हिडिओंचा समावेश आहे.