Riteish Deshmukh: अभिनेता, निर्माता की दिग्दर्शक रितेशला सर्वात जवळची भूमिका कुठली? जिनिलियाने केला खुलासा
मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख 'वेड' चित्रपटामुळे चर्चेत आले. उत्तम अभिनेता आणि एक निर्माता असणाऱ्या या चित्रपटातून रितेशने दिग्दर्शनात देखील पाऊल टाकलं. पण या सगळ्यातून रितेशला सर्वात जवळची भूमिका कोणती याबद्दल जिनिलियाने खुलासा केला आहे.
मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख 'वेड' चित्रपटामुळे चर्चेत आले. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे.
2/ 8
उत्तम अभिनेता आणि एक निर्माता असणाऱ्या या चित्रपटातून रितेशने दिग्दर्शनात देखील पाऊल टाकलं.
3/ 8
रितेश देशमुखचं सध्या सगळीकडे कौतुक होत आहे.
4/ 8
पण या सगळ्यातून रितेशला सर्वात जवळची भूमिका कोणती याबद्दल जिनिलियाने खुलासा केला आहे.
5/ 8
जिनिलियाने चाहत्यांसोबत सोशल मीडियावर एक पोस्ट नुकतीच शेअर केली आहे. यात रितेश त्याच्या मुलांसोबत खेळताना दिसत आहे.
6/ 8
पण या व्हिडिओला दिलेल्या कॅप्शनमध्ये जिनिलियाने म्हटलंय कि, 'तो एक चांगला अभिनेता निर्माता किंवा दिग्दर्शक असेल पण तो या सगळ्यात सर्वात जास्त मुलांचा बाबा आहे. ही भूमिका त्याला सर्वात जास्त आवडते.'
7/ 8
रितेश आणि जिनिलियाची मुलं त्यांच्यासारखीच चर्चेत राहतात. आता जिनिलियाने केलेल्या या खुलास्यामुळे रितेशची चाहते भारावले आहेत.
8/ 8
वेड बद्दल सांगायचं तर पठाणच्या दबदब्यातदेखील हा सिनेमा स्थिर उभा आहे. शाहरुखच्या चित्रपटाचा वेडवर फारसा परिणाम झालेला नाही. चित्रपटाने चौथ्या आठवड्यात 6.11 कोटींची कमाई केली आहे. वेड चित्रपटाने एकूण तब्बल 57.15 कोटींचा गल्ला जमवला आहे.