अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी आणि अभिनेत्री जेनेलिया डिसूझा देशमुख हे चित्रपटसृष्टीतील सर्वात क्यूट कपल मानले जाते. दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना आवडते.
हे दोघे शेवटचे 'वेड' या मराठी चित्रपटात एकत्र दिसले होते, पण त्याआधी जेनेलियाने लग्नानंतर बरीच वर्षे काम केले नाही. लग्नानंतर जिनिलिया चित्रपटसृष्टीतून गायब झाली होती. आता अभिनेत्रीने यामागचं कारण सांगितलं आहे.
रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझा बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खानच्या चॅट शो 'व्हॉट वुमन वॉन्ट'मध्ये सहभागी झाले होते. यादरम्यान, बेबोने जेनेलियाने दीर्घकाळ चित्रपटांमधून ब्रेक घेतल्याबद्दल प्रश्न विचारला.
ज्यावर जिनिलिया म्हणाली की 'लग्नापूर्वी ती हिंदी, तेलुगू आणि तमिळ चित्रपटांमध्ये खूप काळ काम करत होती, परंतु लग्नानंतर तिला कुटुंबाला प्राधान्य द्यायचे होते.' असं उत्तर दिलं.
जिनिलियाने सांगितले की, जेव्हा तिने चित्रपटांमधून ब्रेक घेतला तेव्हा तिला लोकांच्या अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागले. रितेशचे वडील राजकारणात असल्याने देशमुख कुटुंबीयांनी तिची फिल्मी कारकीर्द संपवावी असे लोकांनी गृहीत धरले होते, परंतु अभिनेत्रीने त्यावेळी स्पष्ट केले होते की असे अजिबात नव्हते.
अभिनेत्री म्हणाली की, अनेकांनी तिला विचारले की रितेशने तिला चित्रपटांमध्ये काम न करण्यास सांगितले आहे का, तेव्हा तिने सांगितले की तिला दीर्घकाळ काम केल्यानंतर इंडस्ट्रीतून ब्रेक घ्यायचा आहे.
रितेश देशमुखनेही यावर त्याचं मत मांडलं. तो म्हणाला कि, 'चित्रपटांपासून दूर राहायचं आणि कधी परतायचं ही जिनिलियाची स्वतःची निवड होती.'
रितेशने दिग्दर्शित केलेल्या ‘वेड’ या चित्रपटातून जिनिलियाने चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. दोघांचा हा सिनेमा खूपच हिट ठरला होता.