सध्या सोशल मीडिया एक असं मध्यम बनलं आहे. ज्यातून सर्वसामन्य लोक सहज फेमस होऊ शकतात. असे अनेक लोक आहेत ज्यांना कोणत्याही काष्टाशिवाय एका रात्रीत एक नवी ओळख मिळाली आहे. आणि तेही फक्त सोशल मीडियामुळे, आज आपण अशाच काही लोकांबद्दल जाणून घेणार आहोत.
नुकताच नव्याने एक नाव फेमस झालं आहे. आणि ते नाव म्हणजे सहदेव दिरदो होय. या मुलाच्या 'बसपन का प्यार' या व्हिडीओने अक्षरशः सर्वाना वेड लावलं आहे. बॉलिवूड गायक बादशाहने लगेच त्याच्यासोबत एक नवं गाणंसुद्धा तयार केलं आहे.त्यामुळे या मुलाचं एका रात्रीत नशीबचं पालटलं आहे.
आपल्या सर्वांनीचं रेल्वे स्टेशनवर गाणं म्हणणाऱ्या एका महिलेचा व्हिडीओ पहिला होता. तिचं नाव होतं रानू मंडल. तिच्या आवाजाने सर्वसामान्यांसह गायकहिमेश रेशमियालासुद्धा भुरळ पडली होती. हिमेशही तिच्यासोबत एक गाणं रेकॉर्ड केलं होतं.
फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोचा कर्मचारी असणाऱ्या सोनू या व्यक्तीनेही सोशल मीडियावर धम्माल केली होती. तिच्या मजेशीर व्हिडीओनी सोशल मीडियावर तिला प्रचंड फेमस केलं होतं इतकचं नव्हे तर त्याचासाठी झोमॅटोनं आपलं ट्वीटरचं डिस्प्लेसुद्धा बदललं होतं.
सोशल मीडियावर ढिंचॅक पूजा म्हणून प्रसिद्ध झालेली एक सर्वसामान्य मुलगीही एका रात्रीत स्टार बनली होती. तिला इतकी प्रसिद्धी मिळाली होती की, तिला बिग बॉसमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली होती.
तसेच प्रोफेसर संजीव श्रीवास्तव म्हणजेच डब्बू अंकलसुद्धा खूपच प्रसिद्ध आहेत. ते आपल्या डान्सच्या व्हिडीओमुळे प्रसिध्द झाले होते.
तसेच चुलीवर भाकरी करणारी एक मुलगीसुद्धा सोशल मीडियावर खूप व्हायरल होतं आहे. ही मुलगी पाकिस्तानची आहे. अजिबात मेकअप नाही किंवा महागडे ड्रेस नाहीत त्री तिच्या फक्त एका स्मितहास्यावर युजर्स वेडे होतं आहेत.
रेसलर असणाऱ्या साक्षी मलिकची 'सोनू की टीटू की स्वीटीच्या 'बम डीगी बम बम' या गाण्यामुळे सोशल मीडियावर मोठी क्रेझ आली होती. इतकी की अवघ्या काही दिवसांत तिच्या फॉलोअर्सचा आकडा 1 मिलियनच्या पार गेला होता.