'फादर्स डे' (fathers day)हा वडिलांच्या प्रेमाला समर्पित केलेला एक खास दिवस आहे. जो प्रत्येक वर्षी जूनच्या तिसऱ्या रविवारी साजरा केला जातो. यावर्षी 19 जून 2022 रोजी फादर्स डे शुभेच्छा देत साजरा केला जात आहे. यावर्षी पहिल्यांदाच वडील बनलेल्या सर्व सेलिब्रिटींसाठीही यंदाचा फादर्स डे खूप खास आहे.
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय जोडपं म्हणून देबिना बॅनर्जी आणि गुरमीत चौधरी यांना ओळखलं जातं. हे दोघेही नुकतंच एका लेकीचं आईबाबा बनले आहेत. अर्थातच गुरमीत आज आपला पहिला फादर्स डे साजरा करत आहे.
काही महिन्यांपूर्वी बॉलिवूड-हॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनस हे सरोगेसीद्वारे एका लेकीचे आईबाबा बनले आहेत. त्यामुळे निकसाठी हा पहिला फादर्स डे खास असणार आहे.
कॉमेडी क्वीन भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया हे काही दिवसांपूर्वी एका मुलाचे आईबाबा बनले आहेत. त्यामुळे हर्षचा हा पहिला फादर्स डे आहे.
काही महिन्यांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा आणि पती गुडइनफ सरोगेसीद्वारे एक मुलगा आणि एक मुलगी अशा जुळवा मुलांचे आईबाबा बनले आहेत. त्यामुळे हा फादर्स डे त्यांच्यासाठी खास आहे.
गायक-अभिनेता-होस्ट आदित्य नारायण आणि अभिनेत्री पत्नी श्वेता सिंह हे नुकतंच एका मुलीचे आईबाबा बनले आहेत. हा दिवस त्यांच्यासाठीसुद्धा खास असणार आहे.
छोट्या पडद्यावरील अभिनेत्री किश्वर मर्चंट आणि अभिनेता सुयश राय हेसुद्धा काही महिन्यांपूर्वी एका लेकाचे आईबाबा बनले आहेत.
'कुमकुम भाग्य' फेम पूजा बॅनर्जी आणि संदीप सेजवाल यावर्षी 13 मार्च रोजी एका मुलीचे आईबाबा बनले आहेत.