तसेच विराटने म्हटलं, 'मी जर अनुष्काला भेटलो नसतो, तर माहिती नाही मी कुठे असतो. मी आज जो आहे,किंवा जे करत आहे. त्याच्या माध्यमातून माझा काय प्रभाव पडू शकतो, हेसर्व मला अनुष्काने समजावलं होतं. एक व्यक्ती म्हणून अनुष्काने माझ्यामध्ये स्थिरता आणली आहे.आणि याचा फायदा मला क्रिकेटमध्येसुद्धा झाला आहे. तिच्यासारखी जोडीदार मिळाल्याने मी स्वतःला खूपच भाग्यवान समजतो.
तसेच मुलगी वामिकाबद्दल बोलताना विराटने म्हटला हे, 'आम्हा दोघांसाठी आत्ता वामिका सर्वात आधी आहे. तिला झोपवल्याशिवाय आम्ही काहीही करत नाही. आधी तिला व्यवस्थित झोपवून मग मिळालेल्या वेळेत आम्ही कॉफी घेणे किंवा ब्रेकफास्ट घेणे यांसारखी कामे करतो. वामिकाला जास्तीत जास्त वेळ देणं सध्या हेचं आमचं काम आहे.