
संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधलेल्या महामिनिस्टर या कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा रविवारी अखेर प्रेक्षकांना पाहायाला मिळाला.

महामिनिस्टरच्या अंतिम सोहळ्याला झी मराठीवरील अनेक प्रसिद्ध अभिनेत्रींनी हजेरी लावली होती. देवमाणूस मालिकेत नुकतीच एंट्री झालेल्या आमदार देवयानी गायकवाडही महामिनिस्टरमध्ये सहभागी झाल्या होत्या.

आमदार देवयानी म्हणजेच अभिनेत्री तेजस्विनी लोणारीसाठी महामिनिस्टरचा अंतिम सोहळा खास ठरला. महामिनिस्टरनिमित्तानं तब्बल 15 वर्षांनी तेजस्विनीनं आदेश बांदेकरांची भेट झाली.

तेजस्विनीनं आदेश भावोजींसाठी खास पोस्ट लिहित फोटो शेअर केलेत. त्याचप्रमाणे तेजस्वी येवल्याची असल्यानं येवल्यांच्या पैठणीचा अभिमान आणि आनंद देखील तिनं व्यक्त केलाय.

'जवळपास १५ वर्षांपूर्वी एक फॅन म्हणून मी आदेश सरांना भेटले होते. त्यानंतर थेट आज एवढ्या वर्षांनी 'महामिनिस्टर'च्या मंचावर पाहुणा कलाकार म्हणून येण्याचा मान मला मिळाला. माझ्यासाठी ही खूप अभिमानाची गोष्ट असल्याचं मला वाटतं', असं तेजस्विनीनं पोस्टमध्ये म्हटलंय.

तेजस्विनी पुढे म्हणाली, 'त्यात 'पैठणी' ही माझ्या अगदी जवळची कारण मी स्वतः येवल्याची आहे. आमचं येवले हे पैठणींचं गाव म्हणून ओळखलं जातं. त्यामुळे माझं आणि पैठणीचं नातं अगदी जवळच असल्याने माझ्यासाठी हे एक वर्तुळ पूर्ण झाल्यासारखं आहे'.

दाक्षिणात्य सिनेमा त्यानंतर हिंदी टेलिव्हिजनवर काम केल्यानंतर तेजस्विनी आता मराठी टेलिव्हिजकडे वळली.




