महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गणेशोत्सवानिमित्त राज्यातील महत्त्वाच्या गणपती बाप्पांच्या मंडळांना तसेच राजकीय नेत्यांच्या घरी भेट देत आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनेता नाना पाटेकर यांच्या पुणे जिल्ह्यातील सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या डोणजे गावातील घराला भेट दिली.
यावेळी राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत आणि खासदार श्रीरंग बारणे आणि पाटेकर कुटूंबातील सर्व प्रमुख सदस्य उपस्थित होते.