यो यो हनी सिंगचं (Yo Yo Honey Singh) प्रकरण ताज सध्या चर्चेत आहे. त्याच्या पत्नीने त्याच्यावर गंभीर आरेप लावत गुन्हा नोंदवला आहे. तसेच घटस्फोटाची मोठी रक्कमही मागीतली आहे. पण या आधीही बॉलिवूडमध्ये असे महागडे घटस्फोट झाले आहेत. पाहा कोण आहेत.
सिंगर रॅपर हनी सिंह (Yo Yo Honey Singh) वर पत्नी शालिनी तलवारने (Shalini Talwar) त्याच्यावर घरगुती हिंसेचे आरोप लावले आहेत. तर घटस्फोटानंतर १० कोटी रुपये देण्याची मागणी केली आहे.
अभिनेता हृतिक रेशन आणि सुझेन खान यांचा काही वर्षांपूर्वी घटस्फोट झाला. त्यावेळी प्रॉपर्टीसहीत सुझेनने 400 कोटींची मागणी केली होती. त्यावेळी ती फारच चर्चेत होती. काही वृत्तांनुसार ३८० कोटी पर्यंत तिला प्रॉपर्टी, आणि रक्कम देण्यात आली.
आमिर खानने जेव्हा पहिला घटस्फोट घेतला होता. तेव्हा पत्नी रीना दत्ताला 2002 साली त्याने तब्बल 50 कोटी रुपये दिले होते. आमिरला दोन मुलही होती.
काहीच दिवसांपूर्वी आणिर खान आणि किरण राव यांचा घटस्फोट झाला हे आमिरचं दुसरं लग्न होतं. पण त्याने किती रक्कम दिली याविषयी कोणतीच माहिती समोर आली नाही.
संजय दत्तने 1998 मध्ये रिया पिल्लईशी दुसरा विवाह केला होता. पण काही काळातच ते वेगळे झाले. तेव्हा त्याने ८ कोटी रुपये दिले होते.
अमृता सिंग आणि सैफ अली खान यांनी २००४साली घटस्फोट घेतला होता. तेव्हा तिला ५ कोटी रुपये तर मुलगा १८ वर्षांचा होईपर्यत दरमहा १ लाख रुपये रक्कम कबूल केली होती.
अरबाज खान आणि मलायका अरोरा यांनी काही वर्षांपूर्वी घटस्फोट घेतला. वृत्तांनुसार अरबाजने मलायकाला १५ कोटी रुपये दिले.
करिश्मा कपूरने बिझनेसमॅन संजय कपूरशी लग्न केलं होतं. पण २०१४ साली विभक्त झाले होते. त्यावेळी करिश्माने ७ कोटी रक्कम घेतली होती तसेच दरमहा १० लाखंचं बॉन्डही करण्यात आलं होतं. त्यांना दोन मुलं आहे.