बॉलीवूडमध्ये अशा अनेक प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. ज्यांना चित्रपटाच्या चित्रीकरणा दरम्यान आपण गरोदर असल्याची जाणीव झाली होती. त्यावेळी त्या मोठमोठ्या चित्रपटांच्या चित्रीकरणात व्यस्त होत्या. आणि या बातमीमुळे त्यांच्या दिग्दर्शकांच्या समोर मात्र मोठा पेच निर्माण झाला होता. मात्र या अभिनेत्रींनी योग्य पद्धतीने परिस्थिती हाताळली होती.
जेव्हा जुही चावलाला आपल्या पहिल्या गरोदरपणाची माहिती समजली होती. तेव्हा ती एका कार्यक्रमासाठी विदेश दौऱ्यावर जाणार होती. आणि दुसऱ्या दुसऱ्या गरोदरपणाची माहिती मिळाली तेव्हा ती 'झंकार बिट्स' या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त होती. मात्र तिने कोणतीही विश्रांती नं घेता आधी चित्रीकरण पूर्ण करून घेतलं.
असं म्हटलं जातं की अभिनेत्री श्रीदेवी बोनी कपूर सोबत लग्न करण्याआधीच गरोदर होती. तेव्हा ती 'जुदाई' या चित्रपटाचं चित्रीकरण करत होती.आणि बोनी कपूर हे या चित्रपटाचे निर्माता होते. मात्र तिनं विश्रांती नं घेता आधी चित्रीकरण पूर्ण करून घेतलं. चित्रपटानंतर श्रीदेवी यांनी जान्हवी कपूर हिला जन्म दिला होता.