बॉलिवूडचा अतिशय देखणा आणि प्रतिभावान अभिनेता कार्तिक आर्यनने 22 नोव्हेंबर रोजी त्याचा 31 वा वाढदिवस साजरा केला. यानिमित्त ऑलिव्ह बार खार येथे एका बर्थडे पार्टीचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये अनेक बॉलिवूड स्टार्स पोहोचले होते. कार्तिक आर्यन सध्या त्याच्या करिअरच्या शिखरावर आहे. त्याचा 'धमाका' हा चित्रपट 19 नोव्हेंबर रोजी OTT प्लॅटफॉर्म Netflix वर प्रदर्शित झाला. या चित्रपटातील त्याच्या कामाला पसंती दिली जात आहे. या चित्रपटात कार्तिक आर्यनने त्याच्या रोमँटिक इमेजमधून बाहेर येत काम केले आहे. वाढदिवसानिमित्त त्याने हे दुहेरी सेलिब्रेशन केले.
एकता कपूरनेही कार्तिक आर्यनच्या वाढदिवसाच्या पार्टीला हजेरी लावली होती. सध्या ती कार्तिक आणि अलाया एफ स्टारर 'फ्रेडी' या चित्रपटाची निर्मिती करत आहे.
कार्तिक आर्यनचा बेस्ट फ्रेंड आणि 'प्यार का पंचनामा' स्टार सनी सिंगनेही वाढदिवसाच्या पार्टीला हजेरी लावली होती