सलमान खानच्या 'बिग बॉस ओटीटी 2' च्या 13व्या स्पर्धकाचे नाव आहे पूजा भट्ट, जी एक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आणि आलिया भट्टची बहीण आहे.
मीडिया रिपोर्टनुसार पूजा भट्टबद्दल बातमी आहे की ती आज रात्री या शोमध्ये स्पर्धक म्हणून प्रवेश करणार आहे. पूजा भट्ट किंवा 'बिग बॉस ओटीटी 2' च्या निर्मात्यांनी याची पुष्टी केलेली नाही.
पूजा भट्ट अनेकदा वादात देखील सापडते. त्यामुळे 'बिग बॉस ओटीटी 2' मध्ये देखील पूजा राडा करणार यात शंका नाही.
पूजा भट्टच्या वर्कफ्रंट बद्दल सांगायचं तर ती अलीकडेच बॉम्बे बेगम या वेब सिरीजमध्ये झळकली होती. तिच्या अभिनयाचं कौतुक देखील झालं होतं.
जिओ सिनेमाच्या ट्विटनुसार, 'बिग बॉस OTT 2' चा प्रीमियर आज रात्री 9 वाजता होणार आहे. प्रेक्षक Jio Cinema App वर याचा मोफत आनंद घेऊ शकतात. 'बिग बॉस OTT 2' ची सुरुवात सलमान खानच्या ढासू एंट्रीने होणार आहे.