प्रसिद्ध आर्ट दिग्दर्शक उमंग कुमार यांनी तयार केलेला 'बिग बॉस ओटीटी 2'चा सेट अतिशय शानदार आहे. अनेक वर्षांपासून ते बिग बॉस प्रॉडक्शन टीमचा भाग आहे. दुसरा सीजन आपल्या वेगळ्या स्टाईल आणि फॉरमॅटने प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. सेटचे काही फोटोही तुम्ही पाहू शकता.
'बिग बॉस'ची टीम प्रत्येकवेळी काहीतरी वेगळं करण्याच्या प्रयत्नात असते. यंदा या शोचे सूत्रसंचालन सलमान खान करणार असून यामध्ये प्रसिद्ध अभिनेते आणि स्टार्स स्पर्धक म्हणून सहभागी होणार आहेत.
'बिग बॉस ओटीटी 2'चा सेट स्पर्धकांसाठी तसेच प्रेक्षकांसाठी एखाद्या सरप्राईज पॅकेजपेक्षा कमी नाही, ज्यात प्रत्येक रूम एक वेगळी गोष्ट सांगताना दिसत आहे.
'बिग बॉस ओटीटी 2'चा सेटचे फोटो पाहिल्यानंतर लक्षात येते की, यंदा स्पर्धकांसमोरील आव्हाने पूर्वीपेक्षा अधिक कठीण असतील.
शोच्या प्रोमो व्हिडिओमध्ये सलमान खान म्हणताना दिसत आहे, 'मी येतोय, बिग बॉस ओटीटीवर. 'बिग बॉस ओटीटी 2' 17 जूनपासून ग्रँड ओपनिंगसाठी सज्ज झाला आहे