मालिकांमधल्या भूमिकांपेक्षा रिअॅलिटी शोमधून चाहत्यांसमोर येत लोकप्रिय झालेला चेहरा म्हणजे मीरा जगन्नाथ.
‘बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यावर मीरा जगन्नाथ या नावाला आणि माझ्या चेहऱ्याला ओळख मिळाली, यापूर्वी एवढी भांडणं करण्याची संधी कधीच मिळाली नव्हती, मात्र संवाद गरजेचा असतो. मी एखाद्या गोष्टीचं नेतृत्व करू शकते, मी कणखर मुलगी आहे याची जाणीव मला तिथं झाली,’ असं मीरा सांगते.
यंदाच्या सीझनमध्येही मीरा जगन्नाथने ‘बिग बॉस’ मराठीच्या घरात हजेरी लावली होती. मागच्या आठवड्यात मीरा जगन्नाथ आणि विशाल निकम घरातून बाहेर पडले.
गाडी सोबतचे फोटो शेअर करत मीराने लिहिलंय कि, ''दत्त जयंतीच्या मुहूर्तावर, घरच्यांच्या आशीर्वादाने आणि तुम्हा सर्व चाहत्यांच्या प्रेमामुळे, माझं पहिलं वाहन घेत आहे!''
अभिनेत्री मीरा जगन्नाथ आता आपल्याला एक नव्या रूपात दिसणार आहे. स्टार प्रवाहावरील ‘ठरलं तर मग’ या मालिकेत मीरा साक्षी ही खालनायिकेची भूमिका साकारणार आहे.