सध्या प्रसाद जवादे ट्विटरवर ट्रेंड होतोय. 'प्रसाद जवादेला टार्गेट करणं बंद करा' या हॅशटॅगसह तो १ नंबरला ट्रेंड होत आहे.
ट्विटरला ट्रेंड होणार प्रसाद हा बिग बॉस मराठीच्या घरातील पहिलाच सदस्य ठरला आहे. प्रसादला सध्या चाहत्यांची खंबीर साथ मिळतेय.
खरंतर काल बिग बॉसच्या चावडीवर महेश मांजरेकरांनी प्रसादची थट्टा केली होती. सगळ्या सदस्यांनी देखील त्याची मजा घेतली होती.
मांजरेकर म्हणाले होते कि, ''ज्या माणसाला कळेल प्रसादच्या डोक्यात काय चाललंय त्याला मी १ करोड रुपये देईन. काहीच अंदाज लागत नाही तुला काय म्हणायचंय त्याचा.'' या त्यांच्या वाक्याला इतर स्पर्धकांनी देखील दुजोरा दिला होता.
आता मांजरेकरांनी केलेल्या या थट्टेमुळे प्रसादाचे चाहते मात्र नाराज झालेत. आणि त्यांनी ट्विटरवर 'प्रसाद जवादेला टार्गेट करणं बंद करा' हा हॅशटॅग ट्रेंड केला आहे.
ट्विटरवर आतापर्यंत जवळजवळ २१ हजार लोकांनी या हॅशटॅगसह ट्विट केले आहेत. प्रसादाचे चाहते त्याला मोठ्या प्रमाणात साथ देताना दिसून येत आहेत.
'प्रसाद तू चांगलं खेळतोस', 'तुला आमची कायम साथ राहील', 'असंच छान खेळत राहा', 'तूच जिंकशील' असे ट्विट करत चाहते प्रसादच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहेत.