बिग बॉसने सदस्यांवर रोख ठोक हे कार्य सोपवलं आहे. काल मिळालेल्या चार कॅप्टन्सीच्या उमेदवारांमध्ये हे कार्य रंगणार आहे.
या टास्कमध्ये आज शाब्दिक युद्ध रंगणार आहे. आज उमेदवार त्यांची मते मांडणार असून इतर सदस्य देखील साक्षिदार म्हणून या कार्यात सहभागी होणार आहेत.
यावेळी तेजस्विनी लोणारी हिला कॅप्टन बनवण्यासाठी किरण माने यांचा विरोध आहे. त्यासाठी ते तिला शाब्दिक सल्ला देताना दिसणार आहेत.
किरण माने यांचे म्हणणे आहे, "ज्यावेळेस चांगली माणसं आपल्यापासून तुटतात आणि आपल्या ग्रुपमध्ये वादंग निर्माण करणारी, गढूळता निर्माण करणारी माणसं जेव्हा येतात तेव्हा आपणं आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे".
"निर्णय क्षमता नसल्याने तुमच्यापासून माणसं तुटतात. मॅडमना (तेजस्विनीला) असं वाटतं कि, बिग बॉस हा गेम फक्त शक्तीचा आहे... पण हा गेम शक्तीचा नसून तितकाच युक्तीचा, बुद्धीचा देखील आहे".
"युक्ती पण येऊ देत तुमच्याकडे. चार युक्तीच्या गोष्टी सांगणारा म्हातारा माणूस येऊ देत तुमच्याकडे. पण त्यांना युक्ती अत्यंत फालतू वाटली आणि म्हणनूच त्यांनी युक्तीची दोन माणसं काढून टाकली", असं किरण माने म्हणाले.
किरण माने पुढे म्हणाले, "दोन माणसं काढल्यानं एक कन्फ्युजिंग माणूस घेतला. हा lack of decision मेकिंग आहे असं मला वाटतं"