बिग बॉस मराठीची या आठवड्यातील चावडी चांगलीच रंगली. आरोप प्रत्यारोप तर बघायला मिळालेच पण, काही सदस्यांना आता जागं होण्याची गरज आहे असे देखील महेश मांजरेकरांनी सांगितले.
योगेशला सक्त ताकीद मिळाली जर या पुढे कोणाचा बाप काढला तर घरामधून बाहेर काढेन. काही सदस्यांना पत्राद्वारे आपल्या व्यक्त करण्याची संधी बिग बॉस यांनी दिली.
दिवाळीनिमित्त काही स्पेशल भेटवस्तू सदस्यांनी एकमेकांना दिल्या. ज्यामध्ये त्रिशूलने योगेशला नारळ देऊन बाहेरचा रस्ता दाखवला, तर अपूर्वाला मिळाली काडेपेटी. तेजस्विनीला मिळाले रिमोट कंट्रोल.
या आठवड्यात मेघा घाडगे यांना घराबाहेर पडावे लागले. सुरुवातीपासून चांगलं खेळात आल्या पण मागच्या आठवड्यात त्यांचं आणि योगेशचं जबरद्स्त भांडण झालं होतं.
त्यावरून मांजरेकरांनी चावडीत त्यांची चांगलीच शाळा घेतली होती. पण कमी मत मिळाल्याने मेघा यांना विग बॉसचा निरोप घ्यावा लागला आहे.
"अमृता देशमुख धन्यवाद मला चूक नसताना नॉमिनेट केलं... किरण माने तुमच्यामुळे मी बाहेर आले आहे. AV पहिली मी या माणसापासून सांभाळून राहा" असा सूचक सल्ला मेघा घाडगे यांनी सदस्यांना दिला आहे.