बाळूमामांच्या जीवनचरित्रावर आधारित असणारी 'बाळूमामांच्या नावानं चांगभलं' मालिका प्रचंड लोकप्रिय आहे.
कलर्स मराठीवर ही मालिका मागील चार ते पाच वर्षांपासून सुरु असून आजही त्या मालिकेला लोक तितकेच आवडीने बघतात.
कोणत्याही मालिकेसाठी १२०० भाग पूर्ण करणं हा महत्वाचा टप्पा असतो. तो 'बाळूमामांच्या नावानं चांगभलं' च्या टीमने गाठला आहे.
'बाळूमामांच्या नावानं चांगभलं' मालिकेत बाळुमामाची भूमिका अभिनेता सुमित पुसावळे याने साकारली आहे. त्याचे या भूमिकेसाठी प्रचंड कौतुक केले जाते.