साऊथ सिनेमातील सुंदरी अनुष्का शेट्टीने 'बाहुबली' चित्रपटात देवसेना साकारून प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं होतं.
'बाहुबली' चित्रपटातील देवसेना म्हणजेच अनुष्का शेट्टीने तिच्या सौंदर्याने सगळ्यांनाच भुरळ घातली होती.
बऱ्याच दिवसांपासून ही अभिनेत्री चित्रपटसृष्टीपासून गायब आहे. नुकतेच तिचे काही लेटेस्ट फोटो समोर आले आहेत जे पाहून चाहते थक्क झाले आहे.
अनुष्का शेट्टी बऱ्याच दिवसांपासून लाइमलाइटपासून दूर होती. नुकतीच महाशिवरात्रीनिमित्त एका मंदिरात दर्शन घेण्यासाठी ती आली होती.
अनुष्का शेट्टीला बऱ्याच काळानंतर पाहून तिचे चाहते खूश झाले पण तिच्या बदलेल्या रुपामुळे आश्चर्यचकित झाले.
पांढऱ्या ड्रेसमध्ये अनुष्कानं यावेळी नो मेकअप लूकला पसंती दिली होती. पण, इथं तिच्या लूकपेक्षा जास्त चर्चा वाढलेल्या वजनाचीच झाली.
वाढलेल्या वजनामुळं ती बॉडी शेमिंगचा शिकार झाली. तिला पाहताच नेटकरी चकित झाले आहेत तर काही जण तिच्यावर निशाणा साधताना दिसत आहेत.
सध्याचे फोटो व्हायरल होत असतानाच अभिनेत्रीला बॉडी शेमिंगचा सामना करावा लागत आहे. अभिनेत्री होण्यापूर्वी अनुष्का एक प्रोफेशनल योगा इंस्ट्रक्टर होती.