पहिल्याच गाण्याने त्यांना रातोरात स्टार बनवले. त्यांना आज संगीत विश्वाचा रॉकस्टार म्हणून ओळखलं जातं.गेल्या अनेक दशकांपासून ते आपल्या गायन, गाणी आणि संगीताने मन जिंकत आहे. ते आपल्या देशाचा अभिमान आहेत, पण जेव्हा ते 11 वर्षांचा होते तेव्हा त्यांना त्यांच्या आईच्या सांगण्यावरून आपले शिक्षण सोडावे लागले, कारण वडिलांच्या निधनानंतर घर चालवण्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली. खेळा- बागडायच्या दिवसात त्यांच्यावर घराची जबाबदारी पडली. त्यानंतर त्यांनी 'रोजा' चित्रपटासाठी एक गाणे तयार केले, ज्यामुळे ते देशभर लोकप्रिय झाले.
त्यांचे संगीत जगभरातील करोडो लोकांच्या हृदयात आहे. संगीताच्या दुनियेतला तो एक सुपरस्टार आहे, ज्यांच्या गीत आणि संगीताचा कोणीच नाद करू शकत नाही. असं जरी असलं तरी या संगीतकाराचे बालपण सुखाचे नव्हते. वयाच्या 9 व्या वर्षी वडिलांना गमावल्यानंतर त्यांना खूप त्रास सहन करावा लागला. वयाच्या 11 व्या वर्षी त्यांनी शाळा सोडली आणि कामाला सुरुवात केली. आई करीमा बेगम आणि बहिणीने एका मुलाखतीत एआर रहमान यांच्या आयुष्यातील काही अज्ञात पैलू उलगडले होते. (फोटो क्रेडिट्स: Instagram @arrahman)
एआर रहमान यांची दिवंगत आई करीमा बेगम यांनी 'ओ2इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, त्यांनी एआर रहमानला शाळेत जाणे बंद करून संगीतकार होण्यास सांगितले होते. त्या म्हणाल्या होत्या की, 'तो माझ्याशी नेहमी वाद घालायचा की तो संगीतकार म्हणून काम करू शकतो किंवा शिकू शकतो. त्याला काम करायचे होते कारण जेणेकरून आम्ही चांगले जगू शकेल. म्हणून, मी त्याला संगीत सुरू ठेवण्यास आणि शाळा सोडण्यास सांगितले. (फोटो क्रेडिट्स: Instagram @arrahman
एआर रहमानच्या बहिणीने सांगितले की, माझा भाऊ अभ्यासात चांगला नव्हता, पण त्याला शाळा सोडायची नव्हती. ती म्हणाली, तो काळच तसा होता, त्याला शाळेत जायचे होते आणि घर चालवण्यासाठी आईला पैशांची गरज होती. या मुलाखतीत एआर रहमान देखील उपस्थित होते. ते म्हणाले होते की, माझ्यासाठी निर्णय घेणं खूप अवघड होतं, शाळा सोडल्यानं माझं मन तुटलं होतं, मला वाटलं होतं आता काय होणार?' (फोटो क्रेडिट्स: Instagram @arrahman)
एआर रहमान यांनी वयाच्या 11 व्या वर्षी काम करायला सुरुवात केली. त्यांनी सुरुवातीला काही पैसे वाचवले आणि एक स्टुडिओ भाड्याने घेतला, जरी त्यांच्याकडे वाद्ये खरेदी करण्यासाठी पुरेसे पैसे नव्हते, तेव्हा त्यांच्या आईने त्यांना पहिला मिक्सर आणि रेकॉर्डर खरेदी करण्यासाठी पैसे दिले. 'रोजा' चित्रपटासाठी 'चिन्ना चिन्ना असाई' हे पहिले गाणे त्यांनी संगीतबद्ध केलं, ज्याचे हिंदी आवृत्ती 'दिल है छोटा सा' हे गाणं देशभर प्रसिद्ध झाले. या गाण्यातून त्यांनी आपल्या प्रतिभेची झलक आधीच दाखवली होती. या गाण्यानं त्यांना स्टार बनवलं. (फोटो क्रेडिट्स: Instagram @arrahman)
एआर रहमान यांचे पहिले गाणे ऐकून आईच्या डोळ्यात अश्रू तरळले. लहान वयात एआर रहमान त्यांच्या वडिलांची संगीत रचना सुधारत असल्याचे देखील त्यांच्या आईने यावेळी सांगितले. एआर रहमान यांचे वडील आर के शेखर हे देखील संगीतकार होते. एआर. रहमान आपल्या वडिलांचे संगीत ऐकायचे आणि तेच वाजवण्याचा प्रयत्न करायचे. काही वेळा त्यांनी सुरातही बदल केले. वडिलांना आश्चर्य वाटायचे की एवढं लहान मूल आपला सूर कसा बदलू शकतो. नंतर ते आपल्या मुलाचे सूर गाण्यात वापरत असत.