नितेश पांडेने 1995 मध्ये टीव्हीच्या दुनियेत आपल्या करिअरची सुरुवात केली. यानंतर त्यांनी 1998 आणि 2003 मध्ये लग्न केले.
नितेश पांडे यांच्या पहिल्या पत्नीचे नाव अश्विनी काळसेकर आहे. अश्विनी या प्रसिद्ध मराठी आणि हिंदी अभिनेत्री आहेत.
लग्नांनंतर चार वर्षातच 2002 मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर दोघांनीही दुसरं लग्न करत संसार थाटला.
नितेश पांडेंपासून वेगळं झाल्यानंतर अश्विनी काळसेकर हिने 2009 मध्ये प्रसिद्ध चित्रपट आणि टेलिव्हिजन अभिनेता मुरली शर्मा सोबत लग्नगाठ बांधली.
नितेश पांडे यांची दुसरी पत्नी अर्पिता काय करते याबद्दल फारशी माहिती नाही. पण पतीच्या अचानक निधनाने त्यांना नक्कीच धक्का बसला आहे.
सध्या ते टेलिव्हिजनची प्रसिद्ध मालिका अनुपमा मध्ये काम करत होते. त्यांच्या जाण्याने मनोरंजन विश्वात शोक व्यक्त केला जात आहे.