बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांची लेक श्वेता वडील अमिताभ बच्चन, आई जया, भाऊ अभिषेक बच्चन यांच्या विपरीत लाइमलाइटपासून दूर राहणे पसंत करते. तिने अभिनय क्षेत्रात करिअर केले नाही त्यामागे काही कारणे आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, श्वेता बच्चनची फिल्मी दुनियेत काम करण्याची इच्छा बालपणात एका अपघातानंतर संपली होती, ज्याचा खुलासा तिने 'कॉफी विथ करण' शोमध्ये केला होता.
श्वेताने सांगितले होते की, ती लहानपणी आई-वडिलांसोबत शूटिंगला जायची. ती म्हणाली होती, 'मी लहान असताना चित्रपटांच्या सेटवर जायचे.'एके दिवशी मी माझ्या वडिलांच्या मेकअप रूममध्ये खेळत असताना माझे बोट उघड्या सॉकेटमध्ये अडकले.'
तिने पुढे सांगितलं कि, 'यानंतर मी कधीच सेटवर गेले नाही. ही घटना तिच्या फिल्मी दुनियेपासून दूर राहण्यासाठी कारणीभूत ठरली.'
तसेच तिला प्रसिद्धीच्या झोतात राहणे आवडत नाही, हे तिचे चित्रपटांपासून दूर राहण्याचे आणखी एक प्रमुख कारण आहे.
49 वर्षीय श्वेताने निखिल नंदा यांच्याशी लग्नगाठ बांधली असून, तिला नव्या नवेली नंदा आणि अगस्त्य नंदा नावाची दोन मुले आहेत.