तेलुगू सिनेमा जगतातील लोकप्रिया अभिनेत्री सौंदर्या आजही लोकांच्या स्मरणात आहे. आपल्या साधेपणाने आणि आणि अभिनयाच्या जोराव तिनं चित्रपट विश्वात अल्पावधीतच एक खास ओळख निर्माण केली होती. पण लहान वयातच विमान अपघातात सौंदर्याला जीव गमवावा लागला. सौंदर्याच्या मृत्यूनंतर अनेक वर्षांनी त्यांची शेवटची इच्छा समोर आली आहे.
साऊथ अभिनेत्री सौंदर्याचा मृत्यू होऊन बराच काळ लोटला आहे पण पुन्हा एकदा सौंदर्यांच्या मृत्यूची चर्चा रंगलेली आहे. तिचा प्लेन क्रॅशमध्ये मृत्यू झाला होता. प्लेनमध्ये बसण्याआधी तिचं नंनदेसोबत बोलण झालं होतं.
सौंदर्या ही साऊथ इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव होते आणि तिने रुपेरी पडद्यावर अनेक खास भूमिका साकारल्या होत्या. 18 जुलै 1972 रोजी सौंदर्याचा जन्म झाला. तिचे वडील के. एस. सत्यनारायण हे कन्नड चित्रपट लेखक आणि निर्माता होते.
सौंदर्याची फिल्मी कारकीर्द फार मोठी नव्हती, पण तिने अल्पावधीतच अनेक चित्रपटांतून अभिनय कौशल्य दाखवले होते. सौंदर्याचा 'बा नन्ना प्रीथिसु' हा पहिला कन्नड चित्रपट होता. 2004 साली एका विमान अपघातात सौंदर्याचा मृत्यू झाला. सौंदर्याचे निधन होऊन आता बराच काळ लोटला आहे. पण आता पुन्हा एकदा सौंदर्याची चर्चा होत आहे.
सौंदर्याने वयाच्या 31 व्या वर्षी जेव्हा या जगाचा निरोप घेतला तेव्हा लाखो चाहत्यांना धक्का बसला होता. सौदर्याचा निरागस चेहरा आजही लोकांच्या मनात आहे. आता मृत्यूच्या 19 वर्षांनंतर सौंदर्याची शेवटची इच्छा समोर आली आहे, ज्याने चाहत्यांची मनं दुखावली आहेत. विमानात चढण्यापूर्वी सौंदर्याने तिच्या नंनदेशी संवाद साधला होता.
27 एप्रिल 2004 रोजी विमान अपघातापूर्वी जेव्हा सौंदर्याने तिच्या नंनदेशी बोलली तेव्हा तिने दोन गोष्टींची इच्छा व्यक्त केली. एक सुती साडी आणि दुसरी कुमकुम. पिंकविलाच्या वृत्तानुसार, सौंदर्यानेही राजकारणात प्रवेश केला होता, त्यामुळे तिला कॉटनची साडी नेसून राजकीय कार्यक्रमात सहभागी व्हायचे होते.